बुधवार, २६ ऑगस्ट, २००९

ऑगस्ट महिन्यातील चालु घडामोडी.

-----अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने रविवारी अ‍ॅशेस मालिकेवर पुन्हा हक्क प्रस्थापित करताना रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाला जागा दाखवून दिली! कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व भारताच्या मागे ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर फेकला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग.
-----रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते, सध्या तर स्वाइन फ्लूमुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे अशा परिस्थितीत वेगळ्या पद्धतीने रक्त तयार करता आल्यास ते किती सोयीचे होईल असा विचार अनेकांच्या मनात येत असेल. असाच वेगळा विचार करणाऱ्या वैज्ञानिकांनी आता मानवी मूलपेशींपासून रक्ताची निर्मिती केली आहे.
आयसीसी क्रमवारीत गंभीर पुन्हा ‘टॉप’वर
-----
कसोटी सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्या श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार मायकेल क्लार्क यांची आयसीसी कसोटी क्रमवारीत घसरण झाली असल्याने भारताचा सलामीवीर गौतम गंभीर पुन्हा एकदा टॉपवर पोहचला आहे. गेल्या आठवडय़ात गंभीर चौथ्या स्थानावर होता. न्यूझीलंडविरूद्धचा सामना श्रीलंकेने जिंकला असला तरी त्यामध्ये संगकाराला चांगली कामगिरी करता आलेली नव्हती.
-----
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकाविलेल्या भारताच्या विजेंदर सिंगने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोशिएशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले आहे. विजेंदरच्या कारकिर्दीतले हे सर्वोच्च स्थान असून क्रमावीतील ‘टॉप टेन’मध्ये अन्य तीन भारतीय बॉक्सिंगपटूंनी स्थान पटकाविले आहे.खेलरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या विजेंदरने यावषीज्ञ झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या युरोपियन ग्रां. पि. स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर चीन येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने नेत्रदीपक कामगिरी केली होती.

२ टिप्पण्या:

  1. Hi,

    I am Gopal Tarpe. I am running a MPSC and other competitive exams guidance center at Viman Nagar, Pune. We are also at Facebook.

    Please refer the link : https://www.facebook.com/browse/admined_pages/?id=100003144465344

    उत्तर द्याहटवा
  2. Our Contact details : 9028791290 / 8149142396

    Address : Next to Inorbit Mall, Viman Nagar Pune 411014

    उत्तर द्याहटवा